कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून दोन कैदी पळाले

कल्याण दि.23 जुलै:  कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून दोन कैदी पळाल्याची घटना आज सकाळी घडली. डेव्हिड मुरगेश देवेंद्रम आणि मनिकांतम नाडर अशी या दोघांची नावं असून ते चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात कैदेत होते. सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास हे दोघं पळाल्याचं उघड झालं. जेलच्या उंच भिंतीवरुन सीसीटीव्ही वायरच्या सहाय्याने त्यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. …

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तरुणाला अटक

कल्याण दि.15 जुलै : परदेशातील मोठमोठया कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्याचा रहिवासी आहे. मोहम्मदकडून पोलिसांनी आतापर्यंत 26 पासपोर्ट आणि अनेक खोटी नियुक्ती पत्रं हस्तगत केली आहेत. प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीच्या नावाने एक व्यक्ती बनावट कागदपत्रं तयार करून तरुणांची …

नार्को टेररिझम’विरोधात एकत्रित लढा आवश्यक

कल्याण दि.3 जुलै : तरुणांमध्ये त्यातही शालेय विद्यार्थ्यांमध्ये वेगाने फोफावणाऱ्या व्यसनाधीनतेला ‘नार्को टेररिझम’ जबाबदार असून त्याविरोधात सर्व स्तरातून एकत्रित लढा आवश्यक असल्याचे मत कल्याणातील एका कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, दिशा सामाजिक संस्था आणि अंजूमन फाउंडेशनतर्फे नॅशनल उर्दू हायस्कुलमध्ये आयोजित ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. …

पालिकेच्या महिला प्रभाग अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले

कल्याण दि.1 जुलै : भ्रष्टाचाराने बरबटलेली महापालिका अशी ख्याती असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुम्हा एकदा याच मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. महापालिका प्रशासनात प्रभाग अधिकारी पदावर स्वाती गरुड यांना 25 हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडले आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या या महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.   संबंधित तक्रारदाराने घराच्या दुरुस्तीच्या …

2 रुपये सुट्टे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारले

ठाणे दि.20 जून : दिवसेंदिवस ठाण्यातील रिक्षाचालकाची मुजोरी वाढतच चालल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुट्टे 2 रुपये देण्यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा घटना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे. तुषार म्हात्रे असे या प्रवाशाचे नाव असून ते रिक्षातून ठाणे स्टेशनजवळील नौपाडा भागात उतरले. त्यावेळी 2 रुपये सुट्टे नसल्याने त्यांची …

गर्लफ्रेंडला व्हॉट्स अपवर व्हिडीओ कॉल करून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर दि.20 जून : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. हनी आसवानी असं या मृत प्रियकराचं नाव असून तो उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागात राहत होता. हनी आसवानीचे नालासोपाऱ्यात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सात वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पण हनीला तिच्यासोबतच लग्न करायचं असल्याने त्याने तिला तशी मागणीही घातली होतं. …

उल्हासनगरच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला 4 लाख घेताना पकडले

उल्हासनगर दि.19 जून : उल्हासनगर विभागाच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदार या दोघांना तब्बल 4 लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी विजया जाधव आणि नायब तहसिलदार विकास पवार अशी या दोघांची नावे आहेत.   एका जमिनीच्या प्रकरणात वारसांची नावे चढवून त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती अशी माहिती …

डोंबिवली रेल्वे स्थानकातील मटक्याचा अड्डा अखेर उद्ध्वस्त

डोंबिवली दि.7 जून : डोंबिवली रेल्वे स्थानकात असणारा मटका आणि व्हिडीओ पार्लरचा अनधिकृत अड्डा अखेर आज उद्ध्वस्त करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान या अनधिकृत अड्डयाचा पर्दाफाश झाला होता. याची गंभीर दखल घेत डोंबिवली स्थानकातील सर्व अनधिकृत गोष्टींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलावून …

कल्याणच्या काळा तलाव परिसरात युवकाची हत्या

कल्याण दि.5 जून : एकामागोमाग एक हत्याकांडानी डोंबिवली शहर हादरले असतानाच आज कल्याणच्या काळा तलाव परिसरातही एका युवकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी हत्या झालेल्या युवकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी एलएनएनशी बोलताना दिली. महेश भालेराव (वय वर्षे 25) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून …

उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा: चकली खाल्ली म्हणून चिमुरड्यांची अर्धनग्न धिंड

उल्हासनगर दि.22 मे : उल्हासनगरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून दुकानातील चकली खाल्ल्याच्या रागातून दुकानदाराने दोघा चिमुरड्या भावंडांची नग्न धिंड काढून त्यांचे मुंडन करत त्याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी हिललाइन पोलिसांनी आरोपी पितापुत्रांना अटक केली आहे. किरकोळ कारणावरून लहानग्यांची धिंड काढण्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे उल्हासनगर शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उल्हासनगर – ५ येथील …