रस्त्यावरील खड्डे बुझवण्यासाठी कल्याणात रिक्षाचालकांचा पुढाकार

कल्याण दि.19 जुलै : मुंबईतील खड्डयांबाबत शिवसेना आणि मलिष्का यांच्यातील वाद शिगेला असतानाच याच शिवसेनेची सत्ता असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्त्यावरसुद्धा गोलगोल खड्डे पडले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांची वाट न पाहता हे खड्डे भरण्यासाठी आता रिक्षाचालकांनीच पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. मुंबईतील खड्ड्यांबाबत आरजे मलिष्काने केलेलं गाणं शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या रामबाग परिसरात रिक्षाचालकांनी …

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामूळे अनेक सखल भागात साचलं पाणी

कल्याण दि.18 जुलै : गेल्या काही दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसानं कालपासून कल्याण-डोंबिवलीला झोडपून काढलं असून त्यामुळे शहरांतील सखल भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. पावसाच्या या जोरदार बॅटींगमुळे कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पालिकेच्या कामाची चांगलीच पोलखोल झाली. कल्याणातील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, अहिल्याबाई चौक, भारताचार्य वैद्य चौक, बेतूरकर पाडा …

स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महापौर देवळेकर

      कल्याण दि.7 जुलै : ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणाऱ्या ‘स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले आहे. स्वाईन फ्ल्यू तसेच इतर साथरोगांसंदर्भात महापौर देवळेकर आणि सेनेच्या नगरसेवकांन महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.   आतापर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 753 संशयित रुग्णांची …

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

  डोंबिवली दि.5 जुलै: डोंबिवली पूर्वेच्या आयरे रोड परिसरात असणाऱ्या धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीच्या पूर्व भागातील आयरे रोड परिसरात गंगाराम सदन नावाची 35 वर्ष जुनी इमारत आहे. गेल्या काही वर्षांत धोकादायक बनलेल्या या इमारतीमध्ये काही रहिवाशांचे वास्तव्य होते. आज …

कल्याणच्या लक्ष्मी मार्केटसमोरील रस्त्यावर पुन्हा एकदा पडले भलेमोठे भगदाड

कल्याण दि.30 जून : कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातून मोहम्मद अली चौकाकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा खचला आहे. लक्ष्मी मार्केटसमोर बांधण्यात आलेल्या या पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याचठिकाणी अशाच प्रकारची घटना घडली होती. येथील शिवाजी चौकातून मोहम्मद अली चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे गेल्याच वर्षी रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले …

डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी अडवून धरली वाहतूक

डोंबिवली दि.29 जून : डोंबिवलीमध्ये प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये चांगलाच वाद पेटला. भाडे घेण्याच्या कारणावरून संतापलेल्या प्रवाशांनी केळकर रोडवर अर्धा तास वाहतूक अडवून ठेवली. डोंबिवलीमध्ये चाकरमान्यांना घरापर्यंत जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याय हा रिक्षा असतो. पण, मनमानी कारभार आणि रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवाशांना अनेकदा फटका बसतो. मात्र आज प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला. भाडे न घेण्याच्या कारणावरून प्रवाशी आणि …

जून्या पत्रीपुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा संरक्षक कठडा खचला

कल्याण दि.29 जून : मुसळधार पावसामुळे कल्याणात ठिकठिकाणी पाणी साचलेले असतानाच जुन्या पत्रीपुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा संरक्षक कठडा खचल्याची घटना समोर आली आहे. काल दूुुपारी हा प्रकार घडला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. काल दिवसभर कल्याण शहराला पावसाने झोडपून काढले होते. त्यामूळे शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यातच जुन्या पत्रीपुलाला जोडणाऱ्या (सर्वोदय सोसायटीकडील) रस्त्याचा संरक्षक …

अंबरनाथच्या वडोळ गावातील तात्पुरता पूल गेला पावसात वाहून

    अंबरनाथ दि.25 जून: अंबरनाथच्या वडोळ गावातून उल्हासनगरला जाणारा पूल उभारण्याचं काम सदोष कार्यपद्धतीमुळे महापालिकेनं थांबवलं असून त्यात पर्यायी उभारलेला साकवही काल झालेल्या पावसात वाहून गेलाय. त्यामुळं ठेकेदाराच्या मनमानीचा फटका वडोळ गावातल्या शेकडो विद्यार्थ्यांना बसला असून त्यांचा शिक्षणाशी संपर्क तुटलाय. अंबरनाथ पालिकेत येणा-या वडोळ गावाला भौगोलिकदृष्टया उल्हासनगर जवळ असून त्यामुळं इथले शेकडो विद्यार्थी शाळा, …

पहा फोटो…मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली झाली जलमय

कल्याण / डोंबिवली दि.25 जून :  रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शहरांत विविध भागात साचलेल्या या पाण्याचे एलएनएनच्या सिटीझन रिपोर्टरनी पाठवलेले फोटोज…        

नेवाळीत शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन; पोलिसांच्या गाड्या जाळल्या

कल्याण दि.22 जून : सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याविरोधात नेवाळी नाका परिसरात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन केल्याने वातावरण अतिशय तंग झाले आहे. संतप्त आंदोलकांनी यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या असून आंदोलनात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.   आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी नेवाळी, भाल आणि आसपासच्या …