Home News कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात घराची भिंत कोसळून २ ठार; ६ जखमी

कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात घराची भिंत कोसळून २ ठार; ६ जखमी

0
SHARE

 

कल्याण दि.16 जुलै :  

कल्याण तालुक्यातील म्हारळ परिसरात अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून २ जण ठार तर ६ जण जखमी झाले. रविवारी पहाटे ५ वाजता हे सर्ववजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली.

सैफुद्दीन अल्लाउद्दीन खान (४५) आणि इस्लाम निजामुद्दीन शेख (४५) अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. कल्याणचे तहसिलदार अमित सानप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसंच, परवेश बन्सलराज सिंग (२६), फिरदोस इस्लाम मोहम्मद शेख (३८), खुशबू सैफुद्दीन शेख (१६), निलम प्रवेश सिंग (२८) हे सर्वजण जखमी असून त्यांच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात किरकोळ जखमी झालेली ११ वर्षांच्या सोना मोहम्मद इस्लाम शेख या मुलीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

म्हारळ येथे डोंगर उतारावर अत्यंत दाटीवाटीने घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. बहुतांश घरं कच्च्या स्वरूपाची आहेत. त्यापैकी एका घराची भिंत पाउस व कच्च्या बांधकामामुळे अचानक कोसळून हा अपघात झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*