Home Crime Watch परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तरुणाला अटक

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तरुणाला अटक

0
SHARE


कल्याण दि.15 जुलै :
परदेशातील मोठमोठया कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद खान असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्याचा रहिवासी आहे. मोहम्मदकडून पोलिसांनी आतापर्यंत 26 पासपोर्ट आणि अनेक खोटी नियुक्ती पत्रं हस्तगत केली आहेत.

प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीच्या नावाने एक व्यक्ती बनावट कागदपत्रं तयार करून तरुणांची फसवणूक करीत असल्याची तक्रार प्रकाश बोडके यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली.  त्याआधारे बाजारपेठ पोलिसांनी तपास करीत मोहम्मदला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याला पकडण्यात आले त्यावेळी त्याने 7 शर्ट आणि 7 पॅन्ट एकाच वेळी घातल्याचे दिसून आले. जेणेकरून लोकांना त्याची ओळख पटकन सांगता न यावी यासाठी त्याने ही आयडिया वापरल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. तर त्याच्या घरातून तब्बल 26 पासपोर्ट, एसीसी, एल अँड टी, गॅमॉन इंडिया, अल अमामा ग्रुप्स सौदी आदी कंपन्यांची बनावट नियुक्ती पत्रं, ट्रॅव्हल्स कंपनीचे बनावट व्हिजिटिंग कार्डदेखील पोलिसांना सापडले. मोहम्मद हा नोकरीची शोधात असणाऱ्या तरुणांना हेरून त्यांना परदेशात मोठ्या पैशाच्या नोकरीचे आमिष दाखवायचा. त्यासाठी किमान 5 हजारांपासून ते 25 हजारांपर्यंत पैसे उकळले जायचे. आतापर्यंत त्याने अशाप्रकारे 26 जणांना गंडा घातलयाचेही दिघावकर म्हणाले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर पासलकर, उपनिरीक्षक शुभांगी पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*