Home News टिटवाळा येथील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला

टिटवाळा येथील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला

0
SHARE

टिटवाळा दि.14 जुलै:

कल्याण तालुक्यातील काळू नदीवर असणाऱ्या रूंदे गावाजवळील 2 पुल पाण्याखाली गेल्याने गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलावरील पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत असणारे नागरिक दिसत आहेत. सकाळपासून नदीच्या उगमस्थानी कोसळणाऱ्या पावसामुळे टिटवाळा जवळील काळू नदीवरील रूंदे गावा शेजारील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे लगतच्या रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, हाल, उशीद,भोंगळ पाडा, आरेला, नडगांव आदी  गांवाचा टिटवाळा शहर व इतर ठिकाणाशी संपर्क तुटला आहे. यामुळे टिटवाळासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*