home Featured, Politics शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ – अजित पवार यांचे टिकास्त्र

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ – अजित पवार यांचे टिकास्त्र

कल्याण दि.9 जुलै:
‘शिवसेनेची अवस्था म्हणजे दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे. दिवसा मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकत्र बसून निर्णय घ्यायचे आणि संध्याकाळी त्याच निर्णयाला विरोध करायचा. अशा धरसोड वृत्तीमुळेच १९५ आमदारांचा पाठिंबा असूनही ३० वर्षातलं हे सगळ्यात दुर्बल सरकार आहे.’ अशी टीका अजित पवार यांनी केली. कल्याणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेना-भाजपवर टीकास्त्र सोडण्याबरोबरच आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ही घोषणा फोल ठरली असून सरकारमध्येच याबाबत गोंधळाची परिस्थिती आहे.’ सरकार तीन वर्षात पूर्ण अपयशी ठरलं असून राज्यातला कुठलाही घटक सध्या समाधानी नसल्याचं ते म्हणाले. तर सेनेच्या एकीकडे विरोध आणि दुसरीकडे सरकारमधील सत्ता उपभोगण्यावरही ते चांगलेच बरसले. सत्तेची उबही घ्यायची आणि दुसरीकडे आंदोलने करायची अशी दुटप्पी निती शिवसेना राबवत आहे.

तर सरकारविरोधातील अनेक मुद्दे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. योग्य काम न करणाऱ्या व्यक्तीला घरचा रस्ता दाखवण्यात येईल असा सज्जड दमही त्यांनी यावेळी भरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *