Home Civic Issues स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महापौर देवळेकर

स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये – महापौर देवळेकर

0
SHARE

 

 

 

कल्याण दि.7 जुलै :

ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणाऱ्या ‘स्वाईन फ्ल्यू’बाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले आहे. स्वाईन फ्ल्यू तसेच इतर साथरोगांसंदर्भात महापौर देवळेकर आणि सेनेच्या नगरसेवकांन महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

 

आतापर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 753 संशयित रुग्णांची पाहणी करण्यात आली. त्यांच्यापैकी 56 रुग्णांच्या करण्यात आलेल्या स्वाईन चाचणीत 48 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रुख्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात विशेष साथरोग कक्ष तयार करण्यात आल्याचे महापौरांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका या तसेच इतर साथरोगांविरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान या पाहणी दौऱ्यात महापौरांनी ‘स्वाईन फ्ल्यू’ रुग्णांची सध्याची स्थिती, पालिका आरोग्य यंत्रणेची तयारी, औषधांचा साठा, आरोग्य यंत्रणेकडून राबवण्यात येणाऱ्या उपाय योजना, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची माहिती, रुख्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर स्टाफची उपस्थिती, रिक्त असणारी महत्वाची डॉक्टरांची पदे यांच्याबरोबरच अनेक गोष्टींचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याकडून आढावा घेतला. तसेच रुख्मिणीबाई रुग्णालयात उभारण्यात आलेल्या साथरोग कक्षाला आणि जनरल वॉर्डला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी महापौरांसह शिवसेना गटनेते रमेश जाधव, स्थायी समिती सदस्य दशरथ घाडीगांवकर, माजी नगरसेवक गणेश जाधव उपस्थित होते.

#LNN

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*