Home News नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण – आमदार गणपत गायकवाड

नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण – आमदार गणपत गायकवाड

1
SHARE

MlaGanpatGaikwad
 

डोंबिवली दि.6 जुलै :
नेवाळीतील आंदोलकांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच या आंदोलकांना सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्या पदाचा त्याग करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित आगरी, कुणबी, कोळी समाजाच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

नेवाळी इथं नौदलानं सुरू केलेल्या १६७६ एकर जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात २२ जून रोजी स्थानिक शेतक-यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्याला लागलेल्या हिंसक वळणात पोलिसांना मारहाण आणि पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही पॅलेट गनचा वापर केला होता. या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना अमानुष मारहाण केली जात असून कुटुंबियांना त्यांची भेट घेऊ देत नाहीत. तसेच डबा घेऊन जाणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केला. जर आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीला अशी वागणूक मिळत असेल।तर आपल्या पदाचा काय उपयोग? वेळप्रसंगी या आंदोलकांच्या सुटकेसाठी आपण पदाचा त्याग करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या आंदोलनात मारहाण झाल्याने पोलिसांचा स्वाभिमान दुखावला गेल्याने ते ही आंदोलकांना मारहाण करत आहेत. मात्र पैसे घेताना पोलिसांचा हा स्वाभिमान कुठे जातो? असा तिखट सवाल करत आमदार गायकवाड यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

 

तर दूसरीकडे पोलिसांच्या या अत्याचारामुळे आमची सहनशक्ती संपत चालली असून पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वर्दी सोडून समोर यावं, आगरी समाज तुमची काय अवस्था करतो ते पाहा, असं म्हणत आगरी नेते संजय चिकनकर यांनी पोलिसांना थेट आव्हान दिलं. त्यामुळं आता हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

1 COMMENT

  1. King of aagri mumbai var raj karat hota aani karanar aagri koli samudravar rajy karit mhanut nevhacha bharatala jag disala aarmar king kanhoji aagre yache vashaj aahe aamhi
    Jay aagri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*