Home News स्वाईन फ्ल्यू’मूळे ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू ; 242 जणांना लागण

स्वाईन फ्ल्यू’मूळे ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू ; 242 जणांना लागण

0
SHARE

ठाणे दि.5 जुलै :
‘स्वाईन फ्ल्यू’ने ठाणे जिल्ह्याला विळखा घालण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 242 जणांना स्वाईनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर ठाण्यातून मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या 3 रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्ल्यूच्या या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये ‘स्वाईनच्या चाचणी अहवालाची वाट न पाहता सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांवर स्वाईनचे उपचार सुरू करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणांना देण्यात आले आहेत.

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव जाणवत असून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 282 पैकी 242 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 2 पुरुष, 14 महिला आणि 1 गर्भवती महिलेचा समावेश आहे.  ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाईनचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळत असून याठिकाणी 2 जणांचा मृत्यू आणि 44 जणांना स्वाईनची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोणता न कोणता आजार असल्याचे आणि त्यांचे वयोमान 40 ते 55 वर्षांपर्यंत असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.
तसेच स्वाईन फ्ल्यूचा पॅटर्न बदलला असून यंदा एप्रिलऐवजी जूनमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याचे समोर आले होते.

तर आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवचा विचार करून आरोग्य यंत्रणांनी संपूर्ण ताकदीने स्वाईन विरोधात उतरण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

#LNN

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*