home Crime Watch, Featured नार्को टेररिझम’विरोधात एकत्रित लढा आवश्यक

नार्को टेररिझम’विरोधात एकत्रित लढा आवश्यक


कल्याण दि.3 जुलै :
तरुणांमध्ये त्यातही शालेय विद्यार्थ्यांमध्ये वेगाने फोफावणाऱ्या व्यसनाधीनतेला ‘नार्को टेररिझम’ जबाबदार असून त्याविरोधात सर्व स्तरातून एकत्रित लढा आवश्यक असल्याचे मत कल्याणातील एका कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालय, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, दिशा सामाजिक संस्था आणि अंजूमन फाउंडेशनतर्फे नॅशनल उर्दू हायस्कुलमध्ये आयोजित ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते.

 
दहशतवादी कारवायांपेक्षा ‘नार्को टेररिझम’ हा देशाचे अधिक जास्त नुकसान करीत आहे. आपल्याकडील तरुण पिढीच त्यामूळे उद्ध्वस्त होत असून आता या गुन्हेगारांनी शालेय विद्यार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुलांच्या नकळतपणे पिण्याच्या पाण्यातून नशेच्या गोळ्या दिल्या जात आहेत. त्यातून व्यसनाधीन होणाऱ्या मुलांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. त्यामूळे मुलांनी, पालकांनी, शिक्षकांनी जागरूक होऊन एकत्रितपणे त्याविरोधात लढा उभारला पाहीजे अशी गरज यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. आपलं आयुष्य कुर्बान करायचेच असेल तर व्यसनासाठी नको आपल्या देशासाठी कुर्बान करा असे आवाहन करीत उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना नशाबंदीची शपथ देण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त आयुक्त प्रताप दिघावकर, उपायुक्त डॉ. संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय कांबळे, रविंद्र वाडेकर, दिशा फाउंडेशनचे राजेंद्र कुऱ्हाडे, अंजुमन फाउंडेशनचे आजम शेख यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *