Home News घोडबंदर रोडवर गॅसचा टँकर उलटला; वाहतूक थांबवली

घोडबंदर रोडवर गॅसचा टँकर उलटला; वाहतूक थांबवली

0
SHARE

IMG-20170703-WA0025
ठाणे दि.3 जुलै:
ठाण्यावरुन गुजरातला जाणारा एलपीजी गॅसचा टँकर घोडबंदर मार्गावर उलटला त्यातून गॅसगळती सुरू झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
घोडबंदर रोडवरील काजूपाड्याजवळ आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. या अपघातामुळे घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून ठाणे शहरातील माजीवडा ते घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, या मार्गावरुन प्रवास करणं टाळावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ही वाहतूककोंडी फोडण्याचं काम पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*