Home News जूनमध्येच ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस

जूनमध्येच ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस

0
SHARE

 केतन बेटावदकर

कल्याण दि.1 जुलै:
ठाणे जिल्ह्यातील यंदाचा पावसाळा बहुधा रेकॉर्डब्रेक ठरण्याची चिन्ह सद्यस्थितीवरून दिसत असून पहिल्याच महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 हजार मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा हा तब्बल 2 हजार मिलिमीटर अधिक पाऊस असून हा एक नवा विक्रम आहे.

 

यंदाच्या जूनमध्ये 7 तारखेचा मुहूर्त हुकवलेल्या पावसाने जिल्ह्यात अधून मधून हजेरी लावली. पण थोडे दिवसच का होईना तो असा काही बरसला की लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. तर आज सुरू झालेल्या जुलैच्या पहिल्या दिवशीही पावसाचे ‘तेवर’ कडकच असल्याचे दिसत आहे. आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जुनी आकडेवारी पावसाने धुवून काढली असून नव्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 1 जूनपासून (झाला नसला तरी शासकीय नोंदीनुसार) पावसाचा विचार करता ठाणे- 830 मिमी (सरासरी 534 मिमी), कल्याण- 745 मिमी (सरासरी 476 मिमी), मुरबाड -718 मिमी ( सरासरी 378 मिमी), उल्हासनगर – 710 मिमी (457 मिमी), अंबरनाथ – 634 मिमी (457 मिमी), भिवंडी – 699 मिमी (471 मिमी) आणि शहापूर – 751 मिमी (412 मिमी) एवढा पाऊस झाला आहे.

 

पावसाचा हा मनमुराद बरसण्याचा मूड यापूढेही असाच कायम राहू दे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असून सद्यस्थितीचा विचार करता हा पावसाळा रेकॉर्डब्रेक ठरतो की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल.

 

 

*ठाणे*              – *830 मिमी (सरासरी 534 मिमी),*
*कल्याण*          – *745 मिमी (सरासरी 476 मिमी),*
*मुरबाड*           – *718 मिमी ( सरासरी 378 मिमी),*
*उल्हासनगर*     – *710 मिमी (457 मिमी),*
*अंबरनाथ*        – *634 मिमी (457 मिमी),*
*भिवंडी*           – *699 मिमी (471 मिमी)*
*शहापूर*           – *751 मिमी (412 मिमी)*
– केतन बेटावदकर

#LNN

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*