home Crime Watch, Featured पालिकेच्या महिला प्रभाग अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले

पालिकेच्या महिला प्रभाग अधिकाऱ्याला 25 हजारांची लाच घेताना पकडले

#Kdmc1 #LNN
#Kdmc1 #LNN

कल्याण दि.1 जुलै :
भ्रष्टाचाराने बरबटलेली महापालिका अशी ख्याती असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुम्हा एकदा याच मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. महापालिका प्रशासनात प्रभाग अधिकारी पदावर स्वाती गरुड यांना 25 हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडले आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या या महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

 
संबंधित तक्रारदाराने घराच्या दुरुस्तीच्या परवानगीसाठी पालिकेच्या कल्याण पूर्वेतील जे वॉर्डमध्ये अर्ज केला होता. याठिकाणी प्रभाग अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या स्वाती गरुड यांनी मात्र ही दुरुस्ती अनधिकृत ठरवली आणि त्यावर कारवाई करण्याची तक्रादाराला धमकी दिली. तसेच ही कारवाई टाळण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानूसार आज सापळा रचून स्वाती गरुड यांना 25 हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडले. या प्रकाराची माहिती मिळताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले असले तरी इथल्या अधिकाऱ्यांची पैशांची भूक काही भागात नसल्याचेच यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तर लाच घेताना पकडलेले अधिकारी पुन्हा महापालिकेत कसे काय रुजू होतात? त्यांना पुढे शिक्षा का होत नाही?।असा खुला सवाल आता कल्याण डोंबिवलीकर विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *