Home News कल्याण स्टेशनजवळ एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत

कल्याण स्टेशनजवळ एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत

0
SHARE

20170630_144824
कल्याण दि.30 जून :
मुंबईकडे येणाऱ्या हजरत निजामुद्दीन एरनाकुलम मंगला एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान दिड तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात आले.

 

आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांच्या  दरम्यान हा प्रकार घडला. मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस कल्याण स्थानकाकडे येत होती. त्यावेळी रेल्वे ट्रॅक बदलत असताना या एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक रुळावरून उतरले. सुदैवाने ट्रॅक बदलत असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घसरलेले इंजिन रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले. या घटनेनंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान या प्रकारामुळे कसाऱ्याकडून कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती तर कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. इंजिन रुळावर येऊन वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही  अवधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान दिड तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*