home Featured, News महापालिकेचा आपत्कालीन कक्ष डेब्रीजच्या कॉल्सने हैराण

महापालिकेचा आपत्कालीन कक्ष डेब्रीजच्या कॉल्सने हैराण

 

Disaster management cell kdmc

 

केतन बेटावदकर
कल्याण दि.29 जून :
कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरू केलेला आपत्कालीन कक्ष सध्या भलत्याच कारणाने हैराण झाला आहे. पावसाळ्याचा विचार करता त्या अनुषंगाने या कक्षाला फोन कॉल्स येणे अभिप्रेत असताना त्याऐवजी केवळ डेब्रीज उचलण्याच्या कॉल्सची आपत्ती या कक्षावर ओढावली आहे.
महापालिकेतर्फे पावसाळ्यात दरवर्षी आपत्कालीन कक्ष स्थापन केला जातो. पावसाळयात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचाव कार्य विनाविलंब सुरू व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश. मात्र हा उद्देश राहिला बाजूला शहरांत ठिकठिकाणी साचलेले डेब्रीज उचलण्याचेच फोन कॉल्स या कक्षाला येत आहेत. यामागचे कारण जाणून घेतले असता आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने शहरांतील डेब्रीज उचलण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली. आणि या हेल्पलाईनचा टोल फ्री नंबर या आपत्कालीन कक्षाशी जोडण्यात आला आहे. त्यामूळे डेब्रीज उचलण्याचे सर्व कॉल्स या कक्षाकडे येत असून आपत्कालीन कक्षातर्फे संबंधित कंत्राटदाराला माहिती कळवूनही डेब्रीज उचलले जात नसल्याचे सांगण्यात आले. उलटपक्षी महापालिकेच्या एका नगरसेविकेच्या पतीने डेब्रीज उचलले गेले नाही म्हणून आपत्कालीन कक्षाच्या अधिकाऱ्याचा आई-बहिणीवरून उद्धार केल्याचा प्रकार घडला आहे. डेब्रीज उचलण्याच्या कॉल्सवर कार्यवाही करण्यात बराचसा वेळ खर्ची पडत आहे. तेवढ्यावरच ही बाब थांबली नसून अशावेळी एखादी दुर्घटना घडली आणि आपत्कालीन कक्षाकडून त्यावर तात्काळ प्रतिसाद न मिळाल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? हा मुख्य प्रश्न आहे.

यासंदर्भात आपत्कालीन कक्षाचे प्रमुख अधिकारी अनिल लाड यांच्याशी संपर्क साधला असता डेब्रीजचा नंबर आपत्कालीन कक्षाशी जोडणे चुकीचे असल्याचे एलएनएनला सांगितले. तसेच हा क्रमांक बदलून घेण्याबाबत संबंधित यंत्रणाशी बोलणार असल्याचेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *