home Crime Watch, Featured गर्लफ्रेंडला व्हॉट्स अपवर व्हिडीओ कॉल करून तरुणाची आत्महत्या

गर्लफ्रेंडला व्हॉट्स अपवर व्हिडीओ कॉल करून तरुणाची आत्महत्या

उल्हासनगर दि.20 जून :

प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. हनी आसवानी असं या मृत प्रियकराचं नाव असून तो उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागात राहत होता.

हनी आसवानीचे नालासोपाऱ्यात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सात वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पण हनीला तिच्यासोबतच लग्न करायचं असल्याने त्याने तिला तशी मागणीही घातली होतं. मात्र प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्नाची तयारी केली होती.

21 मे रोजी हनी आणि तरुणीची मुंबईतील एका हॉटेलमध्ये शेवटची भेट झाली होती. यावेळी लग्नाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये वादही झाले. यानंतर चिडून घरी आलेल्या हनीने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करुन आत्महत्येची धमकी दिली. त्यावर तिने आत्महत्या करुन दाखव, असं आव्हान दिल्याने हनीने व्हिडीओ कॉल दरम्यानच आत्महत्या केली.

तब्बल 20 दिवसांनंतर हा संपूर्ण प्रकार हनीचे वडील नरेश आसवानी यांना समजला. त्यानंतर त्यांनी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये 18 जून रोजी हनीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर व्हॉट्सअॅप कॉलचा व्हिडीओ मिळतो का? याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *