home Crime Watch, Featured 2 रुपये सुट्टे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारले

2 रुपये सुट्टे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारले

ठाणे दि.20 जून :
दिवसेंदिवस ठाण्यातील रिक्षाचालकाची मुजोरी वाढतच चालल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुट्टे 2 रुपये देण्यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा घटना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे.
तुषार म्हात्रे असे या प्रवाशाचे नाव असून ते रिक्षातून ठाणे स्टेशनजवळील नौपाडा भागात उतरले. त्यावेळी 2 रुपये सुट्टे नसल्याने त्यांची आणि रिक्षाचालकाची बाचाबाची झाले. ज्याचे पर्यावसान मारहाणीमध्ये झाले. संतापलेल्या रिक्षाचालकाने म्हात्रे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रिक्षाचालकाने आजूबाजूच्या आणखी काही रिक्षाचालकानाही बोलावून घेतल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या तावडीतून म्हात्रे यांची सुटका करून रिक्षाचालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकारामुळे रिक्षाचालकांची वाढलेली दादागिरी पुन्हा एकदा समोर आली असून यावर कायमस्वरूपी उपाय योजण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *