Home Crime Watch उल्हासनगरच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला 4 लाख घेताना पकडले

उल्हासनगरच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला 4 लाख घेताना पकडले

0
SHARE
Ulhasnagrsdo
Ulhasnagrsdo caught taking bribe

उल्हासनगर दि.19 जून :
उल्हासनगर विभागाच्या प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदार या दोघांना तब्बल 4 लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी विजया जाधव आणि नायब तहसिलदार विकास पवार अशी या दोघांची नावे आहेत.

 

एका जमिनीच्या प्रकरणात वारसांची नावे चढवून त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती अशी माहिती पक्षकाराचे वकील निलेश जाधव यांनी एलएनएनशी बोलताना दिली. मात्र तडजोडीअंती 4 लाख रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानूसार प्रांताधिकारी विजया जाधव यांनी तक्रारदाराला चिठ्ठी लिहून देत नायब तहसिलदार विकास पवार यांना पैसे देण्यास सांगितले. त्यानूसार तक्रारदाराने तहसिलदार कार्यालयात जाऊन पवार यांची भेट घेतली असता नायब तहसिलदारांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे ते पैसे देण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे 4 लाख रुपये दिल्यानंतर ठाणे अँटी करप्शन युनीटने तो कर्मचारी, नायब तहसिलदार विकास पवार आणि प्रांताधिकरी विजया जाधव यांना अटक केल्याचे ऍडव्होकेत निलेश जाधव यांनी सांगितले.

#LNN

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*