Home Crime Watch डोंबिवली रेल्वे स्थानकातील मटक्याचा अड्डा अखेर उद्ध्वस्त

डोंबिवली रेल्वे स्थानकातील मटक्याचा अड्डा अखेर उद्ध्वस्त

0
SHARE

डोंबिवली दि.7 जून :
डोंबिवली रेल्वे स्थानकात असणारा मटका आणि व्हिडीओ पार्लरचा अनधिकृत अड्डा अखेर आज उद्ध्वस्त करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान या अनधिकृत अड्डयाचा पर्दाफाश झाला होता.
याची गंभीर दखल घेत डोंबिवली स्थानकातील सर्व अनधिकृत गोष्टींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलावून हे सर्व गाळे सील करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवररेल्वे प्रशासनाने आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हे सर्व अनधिकृत गाळे सील जमिनदोस्त करण्यात आले.
यावेळी झालेल्या कारवाईदरम्यान डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, तात्यासाहेब माने, यांच्यासह महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*