Home Crime Watch कल्याणच्या काळा तलाव परिसरात युवकाची हत्या

कल्याणच्या काळा तलाव परिसरात युवकाची हत्या

0
SHARE

कल्याण दि.5 जून :
एकामागोमाग एक हत्याकांडानी डोंबिवली शहर हादरले असतानाच आज कल्याणच्या काळा तलाव परिसरातही एका युवकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी हत्या झालेल्या युवकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी एलएनएनशी बोलताना दिली.
महेश भालेराव (वय वर्षे 25) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून तो आधारवाडी येथील आंबेडकर नगरचा रहिवासी असल्याचे समजते. आज सकाळी काळा तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या लोकांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या जवळील ट्रान्सफॉर्मरजवळ महेशचा मृतदेह आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महेशच्या शेजारी भलामोठा दगडही पडला होता. त्यामूळे दगडाने ठेचून ही हत्या करण्यातच आल्याचा प्राथमिक अंदाज महात्मा फुले पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर महेशची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याचे सांगत त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान स्थानिक पोलिसांबरोबरच कल्याण क्राईम ब्रॅंचनेही घटनास्थळी भेट देत समांतर तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*