home Crime Watch, Featured बेकायदेशीर मालवाहतुकीवरील कारवाईच्या रागातून रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

बेकायदेशीर मालवाहतुकीवरील कारवाईच्या रागातून रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

#Viththalvadistation #LNN

डोंबिवली दि.17 मे:  रेल्वेचे कल्याण स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संदीप तिवारी यांचेवर बुधवारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लगेज माफियांनी हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संदीप तिवारी असे या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून रेल्वेमध्ये बेकायदेशीरपणे सामान चढवण्यावरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

रेल्वेतुन जाणाऱ्या लगेजबाबत तिवारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात विठ्ठलवाडी स्थानकात सामानाची तपासणी करीत तिवारी यांनी बेकायदेशीर लगेजविरोधात कारवाई सुरू केली. त्याचा राग आल्याने तिथे असणाऱ्या मुसा नामक व्यक्तीने बिअरच्या बाटलीच्या काचेच्या साहाय्याने आपल्यावर वार केल्याची माहिती तिवारी यांनी दिली. सुदैवाने हा वार आपण हातावर झेलल्याने केवळ हातालाच दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कल्याण स्टेशन मधील एका टीसीच्या समोर हा हल्ला करण्यात आला. तिवारी यांना कल्याण रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ठाण्याचे वाणिज्य निरीक्षक संजय गुप्तां यांचेवर कोपर रेल्वे स्थानकात अश्याच प्रकारे हल्ला झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *