Home Videos कोलेस्ट्रॉलच्या नावाखाली तेल आणि तूप नाहक बदनाम – वैद्य अभिजित ठाकूर

कोलेस्ट्रॉलच्या नावाखाली तेल आणि तूप नाहक बदनाम – वैद्य अभिजित ठाकूर

1
SHARE
#AyurvedSeminar #LNN
#AyurvedSeminar #LNN

कल्याण दि.23 ऑक्टोबर :
आपल्या आयुर्वेदात तेल आणि तुपाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दोन्ही घटक शरिरातील सांध्यांमध्ये वंगण (ल्युब्रिकंट) म्हणून काम करतात. त्यांचे अतिसेवन चांगले नसून आजच्या काळात कोलेस्ट्रॉलमूळे मात्र तेल आणि तूप हे पदार्थ नाहक बदनाम झाल्याची खंत वैद्य अभिजित ठाकूर यांनी व्यक्त केली. धन्वंतरी जयंतीनिमित्त महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार नरेंद्र पवार यांच्यातर्फे कल्याणात आयोजित ‘आहारातून आरोग्याकडे’ या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्यावर सध्या पाश्चिमात्य गोष्टींचा एवढा पगडा आहे की आपल्या संस्कृती आणि परंपरा निरर्थक वाटू लागल्या आहेत. मात्र हजारो वर्षांपूर्वीच आयुर्वेदाच्या माध्यमातून आहार आणि आरोग्याचा विचार करून ठेवला आहे. तरीही आपण डोळ्यावर झापड लावल्याप्रमाणे पाश्चिमात्य गोष्टींच्या आहारी गेलो असून आज वाढलेले आजाराचे प्रमाण हे त्याचेच द्योतक असल्याचे वैद्य ठाकूर म्हणाले.

आज 8 वर्षांच्या मुलांपासून ते 80 वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांना एकच आजार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ज्येष्ठ नागरिकांचा आजार हा त्यांच्या वयोमानाप्रमाणे असला तरी लहान मुलांचे आजार हे मात्र खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सावयींमूळे होत आहेत. आज आपल्या घरातील आईला आपल्या मुलांच्या आरोग्यपेक्षा टीव्हीवर लागणाऱ्या सिरीयल महत्वाची असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल. तर हल्ली आजाराला कोणत्याच वयाची सीमा राहिली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज आरोग्यापेक्षा केवळ आणि केवळ आपल्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी खाद्य पदार्थ बनवले जात आहेत. जे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांचा पाया रचण्याचे काम करतात. आज आपल्या घरातून जेवणाचे संपूर्ण ताट हद्दपार झाले आहे. हे ताट म्हणजे आपल्या पूर्वजांच्या उदंड आणि तेही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होती. आपल्याला आयुर्वेदाने फार प्राचीन वर्षांपूर्वीच ही आरोग्याचा मंत्र उपलब्ध करून दिला आहे. मात्र आपल्या डोक्यावर असणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीच्या पगड्यामुळे आज आपल्या आरोग्याची अशी दुरावस्था झाली आहे सध्या 90 टक्के आजार हे पोटामूळे आणि उर्वरित 10 टक्के आजार मानसिक स्वास्थ्य बिघडल्यासारख्या इतर कारणांमुळे झाल्याचे ठाकूर म्हणाले.

यावेळी वैद्य अभिजीत ठाकूर यांनी सध्याच्या जीवनशैली, खाण्याच्या सवयी, बहुराष्ट्रीय खाद्य कंपन्यांचा फसवेपणा यावर परखडपणे आपले विचार मांडत उपस्थितांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*